विश्वास नांगरे पाटील यांचा जीवनप्रवास
(५ ऑक्टोबर, इ.स. १९७३; कोकरूड, शिराळा, सांगली - हयात) हे महाराष्ट्र पोलिसातील अधिकारी आहेत. ते सध्या (२०१९ साली) नासिक पोलिस आयुक्त. मुंबईवर २६ नोव्हेंबर इ.स. २००८ रोजी झालेल्या हल्ल्यांच्या वेळी ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. नांगरे पाटील हे एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. तसेच ते नवीन विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.
![]() |
सुरुवातीचा काळ आणि शिक्षण :
विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील गावाचे सरपंच होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बी.ए. ची परीक्षा सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाले. उस्मानिया विद्यापीठातून एम.बी.ए. ची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली.•
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण :
पुणे जिल्हा ग्रामीण पोलीसदलात अधीक्षक असताना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील शेतात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर ४ मार्च २००७ ला छापा टाकून २८७ तरुण-तरुणींना(२१ तरुणीं) अटक केली होती. प्रयोगशाळेत झालेल्या रासायनिक पृथक्करण अहवालानुसार त्यातील २४९ जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते.
तमाम महाराष्ट्राला विश्वास नांगरे पाटलांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीच विशेषतः तरुणांच्या गळ्यातले तर ते ताईतच जणू. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन ती अनुकूल कशी बनवता येते याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे विश्वास नांगरे पाटील. तसेच युवा पिढीसाठी जिवंत आणि ज्वलंत आदर्श आहेत.
विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी खेड्यापाड्यातून आपला प्रवास चालू केला. त्यांचे वडील एक सामान्य शेतकरी होते. विश्वास नांगरे पाटील ते IPS विश्वास नांगरे पाटील हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. विश्वास नागरे पाटलांची कथा फार हृदयस्पर्शी आहे. परंतू मेहनतीच्या बळावर सारं काही शक्य आहे म्हणत ते लढत राहीले. विश्वास पाटील यांचे प्रेरणादायी भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होते हे तुम्हीही कधीतरी नक्कीच अनुभवले असेल. IPS अधिकारी असण्या बरोबरच ते एक उत्तम वक्ता सुद्धा आहेत ज्यामुळे त्यांचा शब्द न शब्द तरुणांच्या मनात घर करून राहतो.
१९९९ साल विश्वास पाटलांच्या आयुष्यातील महत्वाचे साल म्हणावे लागेल. १९९९ साली त्यांची पोस्टिंग औरंगाबादेत झाली व तिथेच त्यांना कुणीतरी औरंगाबादेत राहत असलेल्या मुलीचे स्थळ सुचवले व ते मुलगी बघण्यासाठी आपले ४-५ मित्रांसह मुलीच्या घरी गेले . मुलीचे नाव होते रूपाली.
नांगरे पाटलांची सासुरवाडी मराठवाड्यातील औरंगाबादची. औरंगाबादचे प्रतिष्ठित मुळे कुटुंब. पद्माकर मुळे यांच्या एकुलत्या एक कन्या रुपाली ह्या लग्नांनंतर सौ रुपाली विश्वास नांगरे पाटील बनल्या, तसे पाहायला गेल्यास औरंगाबाद हे नांगरे पाटील ह्यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण ठिकाण / शहर बनले. कारण त्यांचे वैवाहिक आयुष्य व त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात औरंगाबाद येथूनच झाली.
विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare patil) जेंव्हा पहिल्यांदा मुलगी बघायला गेले तेंव्हा आपले ४-५ मित्र बरोबर घेऊन गेले होते त्यामुळे रुपाली यांना समजेचना कि नेमका मुलगा कोण आहे त्यामुळे पुन्हा एकदा विश्वास व रुपाली यांनी एकमेकांना भेटण्याचे ठरवले. दुसर्यावेळी विश्वास व रुपाली एका हॉटेलात भेटले जिथे त्यांनी जवळजवळ १ तास गप्पा मारल्या . पोलीस अधिकाऱ्याच्या खडतर आयुष्याची कल्पना विश्वास यांनी रूपातील ह्या भेटीत दिली. सर्व कल्पना असूनही व स्वतः अत्यंत लाडाकोडात वाढूनही त्यांनी हे खडतर आयुष्य स्वीकारण्याचा निर्णय घेतला
पहिल्या भेटीच्या सहा महिन्यानंतर त्यांनी लग्न केले. आजदेखील त्यांचा संसार सुखाचा आहे. त्यांना दोन गोड मुले आहेत.

लंडनची नोकरी सोडून दहशतवादा विरोधात तरुणांची फौज उभी करणारा आयपीएस अधिकारी
विश्वास नांगरे पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातले तर रुपाली ह्या मराठवाड्यातल्या. त्यामुळे विश्वास यांच्या वडिलांनी सुरुवातीला ह्या लग्नास नापसंती दर्शवली पण विश्वासने आपल्या वडिलांचे मन वळवले व त्यांनी लग्नाला परवानगी दिली. लग्नानंतर विश्वास नांगरेंचे पहिले पोस्टिंग झाले ते धुळे जिल्ह्यात. धुळ्याची गर्मी, कडक उन्हाळा, नवीन संसार हे सगळं रुपाली ह्यांना थोडं कठीण गेलं पण त्यांनी हे सर्व उत्तमरीत्या सांभाळलं. नांगरे पाटलांच्या ह्या पहिल्याच पोस्टिंगच्या काळात त्यांना ३ जातीय दंगली हाताळाव्या लागल्या ज्या त्यांनी धैर्याने हाताळल्या. २६/११ ची परिस्थिती अतिशय बिकट होती कधीही काहीही होऊ शकले असते व अश्या परिस्थितीत रुपालीनी स्वतःला कसे सांभाळले असेल हा प्रश्न आपल्या सर्वानाच पडतो.
आज आपल्या सर्वाना विश्वास नांगरे पाटलांचे यश,त्यांचे कर्तृत्व दिसते पण ह्यात त्यांचा पत्नीचा अतिशय मोलाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही
नाशिकच्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील?
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकलाबदली झाली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, नाशिकचे आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे.
नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील हे आजच आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. तर सिंघल यांची औरंगाबाद पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही आजच पदभार स्वीकारला जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील एकूण 18 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकार्यांना मंत्रालयातून बदलीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आल्याचे समजते.
राज्यातील एकूण 18 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकार्यांना मंत्रालयातून बदलीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आल्याचे समजते.
विश्वास नांगरे-पाटील हे एक बेधडक पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात त्यांनी विशेष कामगिरी बजावली होती. आतापर्यंत मुंबई, ठाणे ग्रामीण, लातूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण व कोल्हापूर अशा विविध विभागांत महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणास्थान असलेले पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांचा आयपीएसपर्यंत प्रवास अत्यंत कष्टप्रद आहे. पाटील हे मूळचे सांगलीचे आहेत. सांगलीतल्या शिराळा तालुक्यातील कोकरूड हे त्यांचे मूळ गाव. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ते पोलिस सेवेत रुजू झाले.
२६/११ चा दहशतवादी हल्ला
२६/११च्या मुबंई हल्ल्याच्यावेळी ताजमहाल हॉटेलमध्ये पोहचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. सोबत फक्त दोन कॉन्स्टेबल आणि एक अंगरक्षक तसेच अंगावर सुरक्षाकवच(बुलेटप्रुफ जाकीट) नसतांनाही ते गोळीबार सुरू असलेल्या ताजमध्ये शिरले. प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले.[२] त्यांच्या या कारवाईने दहशतवाद्यांना ताजमहाल हॉटेल नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले. त्यानंतर नांगरे-पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले व सीसीटीव्हीच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देत राहीले.सकाळी सात वाजता एनएसजीचे कमांडो कारवाईत प्रत्यक्षात सहभागी होईपर्यंत विश्वास नांगरे-पाटील यांची लढाई सुरूच होती.
26/11
बईवर झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ला हा आपल्या देशासाठी एक वाईट आठवण आहे. पण याच हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांनी दाखवलेले शौर्य आणि स्वतःचे प्राण धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड याचे मोल ठरवणेही शक्य नाही. दहशतवाद्यांनी हल्ला करून जेव्हा काही दहशतवादी ताज हॉटेलमध्ये घुसले तेव्हा त्याठिकाणी अनेक लोक होते. त्या सर्वांचे प्राण धोक्यात होते. त्यांना वाचवण्यासाठी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे कशाचीही पर्वा न करता केवळ एका बॉडीगार्डसह ताजमध्ये घुसले. त्यांनी अनेकांचे प्राणही वाचवले. त्यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले. त्या रात्रीची कथा विश्वास नांगरे पाटील यांनी एका वाहिनीवरील मुलाखतीत सांगितली.
पुढील स्लाइड्सवर वाचा,
बुलेटप्रूफ जॅकेटविना केला हॉटेलमध्ये प्रवेश..
गावामध्ये सुरू झाली होती अंत्य संस्काराची तयारी..
No comments:
Post a Comment